दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा लोणंद रस्त्यावर पाटखळ गावाच्या हद्दीत माऊली लॉज समोर देशी बनावटीचे 15 हजार रुपये किमतीचे पिस्टल बाळगणाऱ्या सुयोग दिलीप कदम राहणार मालगाव तालुका सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्याच्याकडील पिस्टल जप्त करण्यात आले आहे या कारवाईची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाली आहे . या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून मालगाव येथील रेकॉर्ड वरचा कदम नावाचा गुन्हेगार देशी पिस्टलसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. देवकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ पाटखळ गावच्या हद्दीत सापळा रचून सुयोग कदम याला ताब्यात घेतले त्याच्या अंगझडतीमध्ये 15000 रुपये किमतीचे देशी बनवण्याची पिस्टल आढळून आले त्याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तीन 25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये उत्तम दबडे,आतिश घाडगे ,विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, संतोष सपकाळ, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे,मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, प्रवीण पवार ,वैभव सावंत ,विशाल पवार ,केतन शिंदे, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, यांनी भाग घेतला होता पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे.