स्थैर्य, सातारा दि. 25 : सातारा येथील गुरुवार परज, समर्थ मंदिर, जुना मोटार स्टॅन्ड परिसरात सुरु आलेल्या जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून धडक कारवाई केली. यामध्ये पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून 6 हजार 977 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमोल आनंद वासूदेव (वय 36, रा.611, मंगळवार पेठ सातारा), शरद शामराव साळुखे (वय 72, रा. साई कॉलनी शाहुनगर सातारा), निलेश प्रकाश गायकवाड (वय 30, रा.287 शनिवार पेठ राजश्री टॉकीजच्या पाठिमागे सातारा), मकरंद प्रभाकर कुलकर्णी (वय 70, रा.3 यादोगोपाळ पेठ, सुयोग मंगल कार्यालयाचे जवळ, सातारा) व अर्जुन शिवलाल राठोड (वय 49, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार सातारा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील गुरुवार परज, समर्थ मंदिर, जुना मोटार स्टॅन्ड परिसरात काही इसम मटका घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास देण्यात आले होते.
त्याप्रमाणे तीन पथक तयार करुन सदर ठिकाणी जावून सापळा रचला असता गुरुवार परज परिसरातसंशयीत दोन, समर्थ मंदिर परिसरात एक व जुना मोटार स्टॅन्ड परिसरात दोन असे एकूण पाच संशयित मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता ते कल्याण मटका घेत असलेबाबत त्यांनी कबूली दिली.
त्यांचेकडून एकूण 6 हजार 977 रुपये किमतीचा जुगार मुद्देमाल हस्तगत केला असून या पाच संशयितांनासातारा शहर व शाहुपुरी पोलीस ठाणेस कारवाई करीता ताब्यात देण्यात आले आहे.या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस हवालदार उत्तग दबडे, संतोष पवार, पोलीस नाईक मोहन नाचन, शरद बेबले, नितीन भोसले, प्रविण फडतरे, राजकूमार ननावरे, पोलीस शिपाई गणेश कापरे, केतन शिंदे व संजय जाधव यांनी सहभाग घेतला होता.