सध्या आपण लिव्हर खराब होणे, सिरॉसिस अशा बऱ्याच केसेस पाहत आहे. आणि ऐकत आहे. त्याचे प्रमाण एकदम वाढले आहे. मनात बरेच प्रश्न येऊ लागतात.
काय आहे लिव्हर चे कार्य ?, फॅटी लिव्हव म्हणजे काय ?, सिरॉसिस का ? केव्हा ? आणि कशा मुळे होते? आणि मग हे सर्व टाळता येऊ शकते का ?
एक एका प्रश्नाचे उत्तर बघुयात.
काय आहे लिव्हर चे कार्य ? –
लिव्हर अर्थात जिगर हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे की जो उजव्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये डायाफार्मच्या खाली बसवलेला असतो. त्याचे वजन साधारण दीड किलो असते. लिव्हर ही एक शरीरातील मोठी फॅक्टरी आहे की ज्यामध्ये स्टोरेज, प्रोसेसिंग आणि निर्मीती म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग अशा गोष्टी घडतात. साधारण पाचशे प्रकारची प्रक्रीया लिव्हर मध्ये घडतात असे आढळून आले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी साखर आपण खातो त्याचा साठा लिव्हर मध्येच होतो. जादाची साखर ही फॅटमध्ये कन्व्हर्ट केली जाऊन ते फॅट पण लिव्हर मध्येच साठवले जातात आणि मग फटी लिव्हरची प्रोसेस सुरू होते.
लिव्हर मध्ये BILE (पित्त – म्हणजे ॲसिडिटी न्हवे) नावाचा ज्यूस तयार केला जातो. जो आपण जे अन्न खातो त्याच्या पचनासाठी आणि चरबीत विरघळणारी VITAMINS जसे की A,D आणि E ही शरीरा मध्ये शोषून घेण्यासाठी फार उपयुक्त ठरते.
लिव्हर मध्ये फॅट आणि प्रोटिन्सचे विघटन केले जाते. की जे व्यवस्थित केले गेले तर वजन आटोक्यात राहते व मेंदूचे कार्य पण उत्तम राहते.
लिव्हर मध्ये रक्त गोठण्यासाठी लागणारे सर्व घटक (जसे की रक्त, प्लाझ्मा आणि प्रोटिन) हे तयार केले जाते.
लिव्हर मध्ये व्हिटॅमिन D पण तयार केले जाते, कोलेस्ट्रोलचा बॅलेंस पण राखला जातो. की ज्या मुळे चांगले कोलेस्टेरॉल शरीरात राखले जाते आणि थायरॉईड हॉर्मोन्सचा बॅलेंस पण लिव्हर मध्येच राखला जातो.
लिव्हर चे काम कसे चालले आहे ते कसे ओळखावे –
LIVER FUNCTION TESTS – म्हणजेच S. Bilirubin, SGPT, SGOT , S. Alkaline Po4 ह्या टेस्ट दर वर्षी ४० वया नंतर जरूर कराव्यात की ज्या मध्ये आपल्याला आपले लिव्हर फंक्शन कसे चालले आहे हे नक्कीच कळते.
लिव्हरचे काम नीट चालत नसेल तर काय त्रास होतो – वजन वाढू लागते, पचन नीट होत नाही, भूक मंदावते, कावीळ होऊन लघवी पिवळी होणे, डोळे पिवळे दिसणे, त्वचा काळी पिवळी होऊन राट होणे, रक्त नीट गोठत नाही त्यामुळे रत्कस्त्राव होऊन शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, व्हिटॅमिन डीचे प्रमाण शरीरात कमी होऊन हाडे ठिसूळ होतात, अमोनिया हा घटक वाढून मेंदूला सूज येणे आणि बधिरता येणे असा त्रास होऊ शकतो, लिव्हर सिरॉसिस मध्ये पोटात पाणी किंवा जलोदर होतो.
“सत्ते पे सत्ता” या सिनिमातला अमिताभ बच्चनजींचा फेमस डायलॉग आपल्या सर्वांना माहीत आहेच की “दारू पिने से लिव्हर खराब हो जाता है !” त्यामुळे दारू पियु नका नाहीतर लिव्हरच वाटोळं झालंच म्हणून समजा. किती दिवसात होईल हे तुम्ही किती जास्त पिता यावरच ठरेल.
फॅटी लिव्हर आणि सिरॉसिस ऑफ लिव्हर म्हणजे काय ? –
लिव्हरचे साधारण वजन दीड किलो असते आणि जेव्हा त्यात चरबी चे प्रमाण वाढते की जे वरील कारणांमुळे होते तर त्याची कार्यक्षमता हळू हळू कमी व्हायला लागते. लिव्हरला सूज येते. हळू हळू जर चरबीचे प्रमाण वाढू लागले तर मग लिव्हर आकुंचन पावते आणि मग लिव्हर सिरॉसिस सुरू होते.
लिव्हरच्या इन्फेक्शन मुळे ज्याला आपण कावीळ (विशेषतः HEPATITIS B /C) असे म्हणतो. त्या मुळे सिरॉसिस पुढे जाऊन होऊ शकतो. सिरॉसिस च्या तीन स्टेजेस असतात. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज मध्ये जेव्हा लिव्हरचे काम फक्त २५ टक्केच राहिलेले असते त्यावेळेस सुद्धा जर आपण आपली जीवन शैली बदलली तर लिव्हर साधारण ३ ते ४ वर्षात परत मूळ पदावर येऊ शकते. पण हे क्वचितच घडताना दिसते. शेवटच्या सिरॉसिस च्या स्टेज मध्ये लिव्हर पूर्णपणे अकार्यक्षम होऊन त्याला LIVER TRANSPLANT शिवाय पर्याय रहातच नाही.
लिव्हर चे कार्य उत्तम कसे ठेवता येईल –
S – Streching
M- Mat excersises
B- Breathing excersises.
योगासने करणे, प्राणायाम करणे, स्ट्रेचिंगचे व्यायाम करणे, चालणे हे साधारण रोज ३० मिनिटे करावीत की ज्या मुळे लिव्हर चे काम उत्तम राहील.
रात्रीचे जेवण हे शक्यतो लवकरच घ्यावे कारण लिव्हर ज्याला आपण बडे भाई असे पण संबोधतो त्याला ही विश्रांती ची गरज असते. जेवढं उशिरा रात्री चे जेवण तेवढा जास्त ताण लिव्हर वर आणि मग आजारांना निमंत्रण.
आहारात काही सुपरफुड्स आहेत की जी लिव्हरची कार्यक्षमता वाढवते आणि त्याचे टोंनिंग उत्तम ठेवते.
लसूण – कच्चा कापून आणि चावून खावा ज्यामुळे ॲन्टीऑक्सीडंट्स मिळते.
हळद आणि मिरे – हे पण लिव्हरच्या टोंनिग ला मदत करते.
अक्रोड /बदाम
खोबरेल तेल – याचे योग्य प्रमाणात सेवन लिव्हर साठी उत्तम असते.
लेमन अथवा लिंबू – यांनी पण लिव्हर चे आरोग्य उत्तम राहते.
घरी बनवलेले दही – किंज्यामुळे पचन उत्तम होते.
बीट रूट
उसाचा रस – शक्यतो ताजा असावा किंज्याने लिव्हरचे आरोग्य उत्तम राहते
फळ भाज्या जसे की गोबी, फ्लॉवर, ब्रोकोली (शक्यतो ऑरगॅनिक) की ज्या मध्ये glutathione हे घटक उत्तम असते आणि जे लिव्हर चे आरोग्य उत्तम राखते.
तर प्रियजन हो ,
‘लिव्हर ‘आहेत आपले बडे भाई !
‘जिगर ‘ या नावाने त्यांना संबोधले जाई !!
ठेवा त्याला टवटवीत आणि तजेलदार !
होईल तुमचे जीवन निरोगी आणि सदा-बहार!!
व्हायचे असेल जर तुम्हाला ‘जिगर-बाज ‘
काळजी घ्या लिव्हर ची तुम्हीं नक्की खास !!!
हा लेख प्रसिद्ध Nutritionist डॉ. लवलीन कौर यांच्या फेसबुक वरचा व्हिडिओ पाहून प्रेरित होऊन लिहिला आहे.
जनहितार्थ जारी
डॉ. प्रसाद जोशी,
अस्थिरोग शल्य – चिकित्सक,
जोशी हॉस्पिटल प्रा. ली.
फलटण