दैनिक स्थैर्य | दि. ९ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने गेट ऑफ इंडिया, मुबंई येथून स्वीप कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता मुधोजी क्लब, माळजाई मंदिर शेजारी, फलटण येथे मतदारांना दाखवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी सातारा याशिनी नागराजन, निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृतीचे काम सुरू आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्का वाढण्यासाठी मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम सुरू आहे. त्याचअनुषंगाने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती होण्यासाठी अशा पद्धतीने उपक्रम सुरू असल्याचे नोडल अधिकारी, स्वीप फलटण सचिन जाधव यांनी सांगितले. तसेच बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान हक्क बजावण्यासाठी आवाहन केले.
यावेळी मतदारांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.