आटपाडी,गोमेवाडीत साहित्य संमेलन थाटामाटात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । आटपाडी । आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील श्री . गजानन हायस्कूलच्या सभामंडपात साहित्य संमेलन थाटामाटात पार पडले. आटपाडी तालुका साहित्य मंचतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . या संमेलनामध्ये कवी संमेलन घेण्यात आले . आटपाडी तालुक्यातील बहुसंख्य कवी , साहित्यिक तसेच गोमेवाडीतील विद्यार्थी , शिक्षक , ग्रामस्थ या संमेलनासाठी उपस्थित होते .

विनोदी चुटके, कथा, कविता वाचन, कवितागायन, पोवाडा , गझल सादरीकरण , पोवाडा तसेच विविधढंगी संस्कारक्षम साहित्यिक कार्यक्रमाने संमेलनाला रंगत आणली .

या कार्यक्रमासाठी विटा येथील रघुराज मेटकरी , प्रा . विश्वनाथ गायकवाड , कडेगाव येथील एम . बी . जमादार , प्रा. साहेबराव चवरे , भिमाशंकर स्वामी , आटपाडी वाचन कट्टा प्रमुख श्री . दिनेश देशमुख , विठ्ठल पंडित गुरुजी , मराठी समिक्षक व लेखक डॉ. सयाजीराजे मोकाशी यांची विशेष उपस्थिती होती .

यावेळी बोलताना गजानन हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे म्हणाले की, आटपाडी तालुका साहित्य मंचाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे . यामुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होऊन भाषा सशक्त होणार आहे. यावेळी प्रा . सुनील दबडे , प्रा. रमेश जावीर , प्रा. विश्वनाथ गायकवाड , रघुराज मेटकरी, एम . बी . जमादार, व्ही . एन . देशमुख , विजय मोटे, अनिता पाटील, मेघा पाटील , श्रीराम अनुसे, हरिभाऊ गळवे, अरविंद चांडवले, डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा. सताजी देशमुख , दयानंद ऐेवळे या कवींनी कविता सादर केल्या . आघाडीचे गझलकार सुधाकर इनामदार यांनी गझला पेश करून उपस्थितांची वाहवा मिळविली . त्यांनी संपूर्ण कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.

जेष्ठ साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांनी सुधाकर इनामदार, कथाकथनकार जीवन सावंत, प्रसिद्ध निवेदक व कवी प्रा . श्रीकृष्ण पडळकर यांच्या सहकार्याने नुकतीच आटपाडी तालुका साहित्य मंचाची स्थापना केली आहे . या मंचाने राबविलेल्या या उपक्रमाचे आटपाडी तालुक्यातून कौतुक केले जात आहे .


Back to top button
Don`t copy text!