पीपीई किट उपलब्ध असलेल्या औषध दुकानांची यादी एफडीएकडून जाहीर


स्थैर्य, मुंबई, दि. 31 : कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट औषध दुकानांमधून उपलब्ध करून देण्यात आले असून पीपीई किट उपलब्ध असलेल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने जाहीर केली आहे.

पीपीई किटची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यात होण्यासाठी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (ड्रग्ज) हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पीपीई किटचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विक्रेते व किट निर्मात्यांशी संपर्क साधण्याचे काम हे सहायक आयुक्त करणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

पीपीई किट वितरणामध्ये आणखी औषध दुकानदारांना सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त (ड्रग्ज) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!