शहरातील दारुची दुकाने बंद करावीत : सुभाष गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण, दि. 28 : फलटण शहरात दारु विक्रीस दिलेल्या परवानगीमुळे गुन्हेगारी व कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढला असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआगोदर शहरातील दारुची दुकाने बंद करावीत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दारु दुकाने सुरु करुन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. यामुळे गोरगरीबांच्या घरात चुली पेटण्याऐवजी भांडणे पेटत आहेत. दारुसाठी तळीराम कोराना संसर्गाचा विचार न करता गर्दी करित आहेत व आपल्या कुटूंबीयांची सुरक्षितता धोक्यात घालत आहेत. तसेच पैशाची चणचण असल्याने तळीराम मंडळी अनेकांकडे पैसे मागण्यास जात आहेत, त्यामुळे या सर्व प्रकाराने कोरोना विषाणूंचा संसर्ग जर फैलावला तर त्याची जबाबदारी शासन घेणार का ? असा सवाल ही व्यक्त करण्यात आला आहे. दारु उत्पादकांच्या आर्थिक फायद्यासाठीच दारु दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकार गरीबांऐवजी धनदांडग्यांचा विचार करीत आहे ही बाब दुर्दैवी असून याबाबत सकारात्मक विचार करावा असे आवाहन करुन उपविभागीय अधिकारी, फलटण यांनी शहरातील दारुची दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!