
सातारा : ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील सर्व देशी दारूविक्री, विदेशी मद्यविक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्ण तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार मतदानाच्या आदल्यादिवशी 14 जानेवारी, मतदानादिनी (ता. 15) संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्यात येईल. मतमोजणीच्या दिवशी (ता. 18) ग्रामपंचायतींच्या हद्दीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहतील, असे आदेशात जिल्हाधिकारी सिंह यांनी नमूद केले आहे.