दैनिक स्थैर्य | दि. 31 डिसेंबर 2024 | फलटण | कोळकी येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये लायन्स इंटरनँशनल तर्फे २ दिवसीय शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा २९ सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि त्याची सांगता रविवारी सायंकाळी ५ वाजता झाली.
या कार्यशाळेमध्ये २१ शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. पुणे येथून आलेले इंटरनँशनल ट्रेनर डाँ. ज्योती तोष्णीवाल यांनी उमलत्या वयातील मुलांसाठी सामाजिक, भावनिक कौशल्यावर आधारीत शिक्षण या विषयावर दोन दिवस सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन लायन क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्ष लायन सौ. स्वाती चोरमले यांनी केले, तर सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेचे उद्घाटन रिजन चेअरमन ला. दिलीप वहाळकर सातारा, यांच्या हस्ते सरस्व्तीपूजन करून सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. त्यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. लायन डिस्ट्रिक्ट ३२३४ ड १ चे प्रांतपाल एम.जे.फ.अँड ला.एम.के.पाटील हे खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षीत शिक्षकांना इंटरनँशनल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ पांडुरंग पवार (भाऊ), व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, ला. गंगाप्रसाद बंडेवार प्रातीय प्रशासकीय अधिकारी, श्री. संदिप चोरमले अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था फलटण, ला. रणजित निंबाळकर, डिस्ट्रिक्ट चेअरमन ला. सुहास निकम, ला. चंद्रकांत कदम, लायन क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्ष ला. स्वाती चोरमले, सचिव ला. संध्या गायकवाड, खजिनदार ला. सिता जगताप, प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर ला. उज्वला निंबाळकर, ला. सुनंदा भोसले, ला. सुनिता कदम, ला. दिपा निंबाळकर, ला. दिपा शिंदे उपस्थित होते.
या वेळी लायन क्वेस्ट कायमस्वरुपी प्रकल्प राबविणार असल्याचे संस्थेने जाहीर केले, आणि कायमस्वरुपी प्रकल्पाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. अँड. एम के पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब फलटण गोल्डन व प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
लायन्स इंटरनँशनल तर्फे आयोजित केलेली ही कार्यशाळा शिक्षकांना सामाजिक आणि भावनिक कौशल्यांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या प्रकारच्या कार्यशाळा शिक्षकांच्या क्षमता वाढविण्यात आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.