
दैनिक स्थैर्य | दि. १६ फेब्रुवारी २०२५ | फलटण | ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो या भावनेतून फलटण लायस क्लबचे अध्यक्ष लायन जगदीश करवा यांचे नेहमीच आचरण राहिले आहे. ते फलटणमधील एक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून, समाजातील गोरगरीब लोकांना मदत करणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
लायन जगदीश करवा यांनी फलटण लायन्स क्लब यांच्या माध्यमातून लायन्स आय हॉस्पिटल चालवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या आय हॉस्पिटलची त्यांनी दिलेल्या दहा गुंठे जागेवर मोठी सुसज्ज इमारत उभी केली आहे. यापूर्वीही त्यांनी दहा गुंठे जागा दान केली होती आणि नुकताच पुन्हा एकदा नव्याने १० गुंठे जागा दान करून समाजातील लोकांच्या पुढे एक आगळे वेगळे दातृत्व ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
लायन जगदीश करवा यांच्या कार्य काळामध्ये अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी कोट्यावधी रुपयाची ही जागा लायन आय हॉस्पिटलला दान केली असून, समाजातील अनेक गरजू गोरगरीब लोकांना अनेक सेवाभावी संस्थांना ते नेहमी मदतीचा हात देत असतात. लायन अर्जुन घाडगे म्हणाले, “लायन जगदीश करवा यांचे हे दातृत्व निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना नेहमी ठेवतो.”
नुकताच काही दिवसांपूर्वी या १० गुंठ्याचा दस्त सहाय्यक निबंध संस्था फलटण या ठिकाणी नोंदविण्यात आला. या दस्ताच्या प्रती सहाय्यक निबंधक पवार यांच्या हस्ते जगदीश करवा यांनी लायन क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला. या कार्यक्रमात लायन अर्जुन घाडगे, माजी प्रांतपाल ला. भोजराज ना. निंबाळकर, लायन आय हॉस्पिटलचे सेक्रेटरी ला.चंद्रकांत कदम, ला. सुहास निकम, ला. रणजीत निंबाळकर, फलटण लायन्स क्लबचे सेक्रेटरी ला. महेश साळुंखे, ला. रतनसीभाई पटेल इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
लायन जगदीश करवा यांची भावना असते की गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाले तर त्यातील काही पैसे एक विश्वस्ताप्रमाणे समाजातील गरजू लोकांना देणे हे माझे कर्तव्य समजतो. याच भावनेतून ते नेहमी समाजातील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या दातृत्वाने समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणण्याची आशा आहे.