
स्थैर्य, फलटण, दि. २२ फेब्रुवारी : वीरशैव लिंगायत समाज सामाजिक संस्था, फलटण यांच्या वतीने ११ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील वधू-वर तसेच पालकांना एकत्र आणून वैवाहिक जुळवणीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या मेळाव्याचा उद्देश आहे.
हा मेळावा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार असून स्थळ आहे महाराजा मंगल कार्यालय, रिंग रोड, लक्ष्मीनगर, फलटण.
-
समाजातील सर्व लिंगायत जाती-पोटजातींसाठी मेळावा खुला राहणार.
-
पुनर्विवाह इच्छुक उमेदवारांचीही नोंदणी स्वीकारली जाणार.
-
सहभागी वधू-वरांची माहिती असलेली पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येणार असून मेळाव्यानंतर २० दिवसांत नोंदणीकृत पालकांना पोस्टाने पाठविण्यात येईल.
-
उपस्थितांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची सोय आयोजकांकडून करण्यात येणार आहे.
-
नाव नोंदणी सकाळी १० वाजता सुरू होईल व औपचारिक उद्घाटन न करता सकाळी ११ वाजल्यापासून प्रत्यक्ष परिचय सत्रास प्रारंभ होणार आहे.
मेळाव्यासाठी नाव नोंदणी शुल्क ₹५०० ठेवण्यात आले आहे. आयोजकांनी उपलब्ध केलेला फॉर्म पूर्ण माहिती व छायाचित्रासह भरून देणे आवश्यक आहे.
समाजातील सर्व कुटुंबांनी आपल्या उपवर मुला-मुलींसह या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे समाजातील विवाह जुळवणी प्रक्रियेला गती मिळण्यासोबतच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे.
