मोदी सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारनेही इंधन करात कपात करावी; भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२१ | सातारा | केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत या मागणीसाठी भाजपा सातारा यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोवईनाका सातारा येथे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणार्‍या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते, असेच सिद्ध होते.

भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील 22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी,तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, चिटणीस विजय गाढवे,सातारा शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे,तालुका सरचिटणीस गणेश पालखे, चिटणीस रवी आपटे,शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे , तालुका उपाध्यक्ष विक्रम पवार, चिटणीस रवि आपटे ,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गोगावले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुजित साबळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे, नगरसेविका आशा पंडित, नगरसेवक विजय काटवटे, नगरसेवक सुनील काळेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनिशा शहा, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निर्मला पाटिल, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष कुंजा खंदारे, सरचिटणीस अश्विनी हुबळीकर, ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार,आरोग्य सेवा आघाडी जिल्हाध्यक्ष आप्पा कदम, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर,उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, सरचिटणीस दीपक क्षीरसागर व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ सचिन साळुंखे, ओबीसी मोर्च्या युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम, युवा मोर्च्या सरचिटणीस स्वप्नील बोराटे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमित भिसे, माजी नगरसेवक किशोर पंडित अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस विक्रम अवघडे, किसान मोर्च्या अध्यक्ष हेमंत शिंद, सोशल मीडिया उपाध्यक्ष अभिजीत लकडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष कदम , अतुल जाधव, भीमराव लोखंडे, सुधीर काकडे, अमोल कांबळे, स्वप्नील लोखंडे, श्रीकांत वायदंडे, दर्शन पवार, रमेश माने, प्रमोद अहिरे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!