दिसभरातील काही घटिका आपल्या प्रपंच करिता न वापरता इतरांसाठी ठेवणे.आपण समाज्याचं देणं आहे.या देण्यातून मुक्त होणे आपले आद्यकर्तव्य आहे.आपल्या वर्तनात नेहमी “माझ्यामुळे तुम्ही नाही” तर “तुमच्यामुळे मी आहे” ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.आपणाला माणसे आपलीशी करायची आहे. त्यासाठी आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
पंगतीत सर्व पदार्थ वारंवार वाढले जातात .फक्त मीठवाला एकदाच येतो.मीठाशिवाय जेवण आपण कल्पनाच करू शकत नाही.आपण आपले न रहात दुसऱ्या साठी समर्पीत होणे गरजेचे आहे.