खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । सातारा । फलटण तालुक्यातील साठेफाटा येथे वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेप, पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. शामसुंदर नारायण इंगळे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. ३0 मे २0१८ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शामसुंदर आणि वडील नारायण भिकू इंगळे यांच्यात स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त झालेल्या शामसुंदर याने रागाच्या भरातच ‘तुला आता जीवंत ठेवत नाही,’ असे म्हणतच वडील नारायण यांच्यावर शहाबादी फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवत डोके, कपाळ आणि कानावर घाव घातला. यात नारायण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शामसुंदर याच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, जखमी नारायण उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हाफ मर्डरचा गुन्हा खूनात दाखल झाला. याचा तपास फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोळ यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्यासमोर सुरु होती. सुनावणीदरम्यान, सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश आरोपी शामसुंदर इंगळे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि तो न दिल्यास सहा महिने साधी शिक्षा सुनावली.
पैरवी अधिकारी म्हणून मुश्ताक शेख यांनी काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हवालदार उर्मिला घार्गे, शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!