दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । सातारा । राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना पडकरांच्या बगलबच्चांनी फोन करून अत्याचार करण्याची धमकी दिली. या धमकीचा आम्ही निषेध करतो. अशा धमक्यांना राष्ट्रवादीच्या महिला, युवती घाबरणार नाहीत. आम्ही राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वाघीणी आहोत. अशा बगलबच्चांना घरात घुसून मारू असा इशारा राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदेशाध्यक्षा सलगर यांना अत्याचार करण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष पूजा काळे, प्राची कांबळे, व युवती उपस्थित होत्या.
यावेळी देशमुख म्हणाल्या, महिला सर्वच क्षेत्रात आणि राजकारणातही आघाडीवर आहेत. प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार पडळकरांचे बगलबच्चे आमच्याकडून हिरावून घेवू शकत नाही. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लढण्याची ताकद दिली आहे. महाविकास आघाडीत महिला सुरक्षित आहेत. गोपीचंद पडळकर पवार साहेबांविषयी बोलतात. फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. तसेच त्याचे बगलबच्चांना मला एवढेच सांगण्याचे आहे की, हे प्रकार थांबवा. महाराष्ट्रातील सर्व महिला, युवती पेटून उठल्या आहेत. महिलांवरील अशी अत्याचाराची भाषा आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला पक्षाने ताकद दिली आहे. त्या ताकतीच्या जारोवर आम्ही राजकारण करतोय. अशा धमक्यांना घाबरून आम्ही घरात बसणार नाही. गेल्या पाच वर्षापेक्षा महाविकास आघाडीत सर्वच महिला सुरक्षित आहे. पवार साहेबांनी आम्हाला आरक्षणाची ताकद दिली तरी फक्त राजकारणात नव्हे तर सर्वच ठिकाणी खंबीर पणे उभे राहण्यासाठी दिलेले आहे.