दहशत दूर करून शहराला सुसंस्कृत ठेवू !’ पांडुरंग गुंजवटेंचा प्रभाग ७ मधील नागरिकांना अनिकेतराजेंसाठी भावनिक संदेश !


स्थैर्य, फलटण, दि. २४ नोव्हेंबर : फलटण शहर आणि तालुक्याने जी ‘प्रशासकीय दहशत’ अनुभवली आहे, ती दहशत आता संपवायची आहे. ही दहशत पूर्णपणे दूर करण्यासाठी आपल्याला श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हाती नेतृत्त्व देणे गरजेचे आहे, असे मत शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग गुंजवटे प्रभाग ७ मधील नागरिकांना पटवून देत आहेत.

पांडुरंग गुंजवटे नागरिकांना भेटून सांगतात की, “आपण सगळेजण एका कुटुंबाप्रमाणे फलटण शहरात प्रेमाने राहत आहोत. आपल्या शहराची ओळख शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून आहे आणि ती आपल्याला कायम जपून ठेवायची आहे.”

शहराची ही ओळख टिकवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी अनिकेतराजे यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे आहे. त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन ते करत आहेत.

गुंजवटे यांच्या बोलण्यातून नागरिकांना शांतता आणि सुरक्षितता देण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट दिसत आहे. त्यांचा हा भावनिक आणि महत्त्वाचा मुद्दा प्रभाग ७ च्या मतदारांवर नक्कीच प्रभाव टाकताना दिसत आहे.


Back to top button
Don`t copy text!