
दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । सातारा । चला जाणुया नदीला अभियाना अंतर्गत कृष्णा नदी संवाद यात्रा आज मौजे मेणवली येथे पोहोचली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला उप वि.अ. धोम पाटबंधारे श्नि.वि.ठोंबरे, श्री. घोलप, गट विकास अधिकारी पंचायत समीती वाई, कनिष्ठ अभियंता प्रकाश मांढरे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील बोरसे व शासकीय सहकारी, सरपंच लक्ष्मी वेदपाठक, उपसरपंच संजय चौधरी व मेणवली गावांचे ग्रामस्थ व जि.प. शाळेचे विद्यार्थी उपस्थीत होते.
गावामध्ये सर्व उपस्थिता समवेत प्रचार फेरीचे आयोजन करुन मेणवली घाट येथे जलपूजन करुण ग्रामपंचायत सभागृह मेणवली येथे सभा घेणेत आली. सभेत प्रफुल्ल जाधव यांनी प्रस्तावना केली. निलेश ठोंबरे, यांनी अभियानाची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
मेणवली नंतर ही यात्रा गणपती घाट वाई शहरामध्ये पोहोचली. वाई येथे आयोजित कार्यक्रमाला संजय डोईफोडे अधिक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ सातारा, अशोक पवार कार्यकारी अभियंता सातारा सिंचन विभाग सातारा, डॉक्टर संदीप श्रोत्री व श्रीकांत वाळुंजकर कृष्णा नदी समन्वयक, राजेंद्र जाधव उपविभागीय अधिकारी वाई, रणजीत भोसले तहसीलदार वाई, किरण मोरे मुख्याधीकारी नगर परीषद वाई व त्यांचे कार्यालयीन अधिक्षक नारायण गोसावी, श्री भरणे पोलीस निरीक्षक वाई, नितीन कदम अध्यक्ष कृष्णा सेवाकारी फाऊंडेशन वाई व त्यांचे सहकारी हे उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे नियोजन निलेश ठोंबरे उ. अ., प्रकाश मांढरे कनिष्ठ अभियंता, स्वप्नील बोरसे कनिष्ठ अभियंता, केदार भाडळकर का. नि. व इतर कर्मचारी वृंद यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. डोईफोडे अ.अ.यांनी भुषवीले. कृष्णा नदी संवाद कार्यक्रमाची प्रस्तावणा अशोक पवार का.अ. यांनी केली. त्यानंतर डॉक्टर संदीप श्रोत्री व श्रीकांत वाळुंजकर यांनी नदीच्या महत्वाबाबत सर्वकक्ष माहिती व महत्वपर मार्गदर्शन केले. नितीन कदम यांनी वाई शहरातील नदी स्वच्छता अभियानाचे अनुभव व समस्या मांडल्या. त्यानंतर अध्यक्ष श्री. डोईफोडे यांनी अभियानाच्या उदिष्टा बाबत विस्तृत माहिती देऊन कार्यकमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन निलेश ठोंबरे यांनी केले.