दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२२ । मुंबई । राज्याची उपराजधानी नागपूर येथे काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांच्यावर संघटन विरोधी काही ‘पक्षकंटकांनी’
भ्याड हल्ला केला होता.या हल्ल्यानंतर पहिल्यादांच अँड.ताजने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्षात संघटनविरोधी लोकांना घुसवून कॉंग्रेसने नागपुरात माझ्यावर प्राणघात भ्याड हल्ला घडवून आणला.कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुपारीबाज दलालांचे हे काम आहे.ही षंड मंडळी बसपाचे नाव पुढे करीत कॉंग्रेस,एनसीपीमधील त्यांच्या मालकांसाठी काम करतात.पंरतु,अशा दलालांना, त्यांनी केलेल्या हल्ल्यांना तसेच त्यांच्याकडून केली जाणाऱ्या बदनामीला भीक घालत नाही.अशा लोकांनी अंगावर येवू नये अन्यथा शिंगावर घेवू’, असा इशारा बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी सोमवारी विरोधकांना दिला.
कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या दबाबामुळे माझ्यावर हल्ला झाला असतांना देखील माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.शहानिशा न करता गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर राजकीय दबाब असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता निपक्षपणे काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी यानिमित्त केले.पक्ष वाढ तसेच संघटनेच्या विचारधारेला मिळणाऱ्या जनसमर्थनामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळेच पक्षाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे.
२३ डिसेंबरला बसपाच्या वतीने नागपूर विधानसभेवर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोर्चात झालेल्या अभुतपूर्व गर्दीमुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांना हाताशी धरून पक्षाला बदनाम करण्याचे काम त्यामुळे ते करीत आहेत. मा.बहन कुमारी मायावती जी यांच्या नेतृत्वात फुले-शाहू-आंबेडकरांचे आंदोलन यशस्वी करायचे आहे,अशी भावना अँड.ताजने यांनी व्यक्त केली. कितीही हल्ले, सामाजिक बदनामी करण्याचे प्रयत्न केले तरी अखेपर्यंत पक्षविस्तार आणि संघटन बांधणीसाठी झटत राहील. बदनामी आणि भ्याड हल्ल्याच्या पलीकडे जावून संघटनेचे काम सुरू आहे.या हल्ल्यानंतरही नागपूरात भव्य आक्रोश मोर्चा संघटनेने करून दाखवत विरोधकांचे तोंड बंद केली आहेत,असे अँड.ताजने म्हणाले.