दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । औंध । महामारीच्या काळात लोकांना दिलासा देऊन कोरोनाला गावाबाहेर रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.ग्रामसेवकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) अर्चना वाघमळे यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषदेच्या नुतन उपमुख्यकार्यकारी अर्चना वाघमळे यांचे स्वागत करताना सातारा जिल्हा ग्रामसेवक संघाचे वतीने अध्यक्ष सी.एम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने नवनिर्वाचित उपमुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांची भेट घेतली. ग्रामपंचायतीचा कारभार चालवताना येणाऱ्या अडचणी तसेच ग्रामसेवकांचे रखडलेले प्रश्न त्यांच्या पुढे मांडण्यात आले. शासनस्तरावर ग्रामसेवकांच्या पाठीशी राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळात संघटनेचे सचिव रियाज शेख,उपाध्यक्ष श्रीमती,मनीषा बोडके, श्रीमती मनीषा तारळकर, पी.बी नाळे, गोविंद शेलारमामा, आर.पी ननावरे, खटाव तालुका अध्यक्ष के एच मोरे,सचिव दादा गावडे, आर एम फडतरे,वी बी खोमणे यांचा समावेश होता.