दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२१ । फलटण । पृथ्वीवर वायु प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आगामी काळामध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करूनच दिवाळी साजरी करूया असे आवाहन ब्लुम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप किसवे यांनी केलेले आहे.
गुणवरे ता. फलटण येथील ब्लुम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘दीपावली सेलिब्रेशन’ च्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य कीसवे बोलत होते. शाळेत दीपावली सेलिब्रेशनच्या निमित्ताने ऑनलाईन क्लास मध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांसह शाळेतील प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळी काढून व स्वतः आकाशकंदील पणती, भेटकार्ड तयार करून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य तनामनात जागविण्यासाठी शौर्याचे प्रतीक असलेला आकर्षक असा किल्ला ही विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात तयार करून त्यावर सजावट केली. दीपावली निमित्त संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे व सचिव सौ. साधनाताई गावडे यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक गिरीधर गावडे , रमेश सस्ते सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.