
सातारा – स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करताना ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर.
स्थैर्य, 4 फेब्रुवारी, सातारा : स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून अलौकिक अशी क्रांती घडवली आहे. अजिक्य उद्योग समुहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करून त्यांनी सर्वांना सहकारातून समृद्धीकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरून वाटचाल करत समाजसेवा आणि शेतकरी हित जोपाण्याचा त्यांचा वारसा अखंडपणे चालवू, असा निर्धार स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यतिथीनिमीत्त करण्यात आला.
सातारा तालुक्याचे भाग्यविधाते व अजिक्य उद्योग समुहाचे संस्थापक स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या 22 व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी सकाळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पुर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर लोटला. स्व. भाऊसाहेब महाराजांना विविध मान्यवरांनी विनम्र अभिवादन व पुष्पांजली अर्पण केली. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक मंडळातील सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनी एकत्र येवून सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले महान कार्य, त्यांची विचारसरणी आत्मसन्मान पूर्वक वागणुक, निस्वार्थी व अभ्यासू वृत्ती आदी बाबत त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांची कास धरून सहकार चळवळ वृध्दींगत करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अंगिकारलेली विकासकामाची धुरा त्यांचे आचार, विचार व जनसामान्यांच्या प्रेमळ पाठिंब्याच्या जोरावर जोमाने पुढे चालविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू, असे अभिवचन ना.. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले. भाऊसाहेब महाराज यांचे सहकारातील योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी सातारा तालुका आणि जिल्ह्यासह राज्यभरात असंख्य सहकारी संस्थांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. केवळ सहकारी संस्था उभारून चालणार नाही तर त्यांना पाठबळ दिले पाहिजे. त्या संस्था उभारीस येवून त्याचा फायदा सर्वसामान्यांना आणि शेतकर्यांना झाला पाहिजे, या उदात्त हेतूने त्यांनी सहकार मंत्री असताना राज्यभरातील सर्व सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच राज्यातील सहकार चळवळ आज जोमाने सुरु आहे. यापुढेही ही चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याची शपथ उपस्थित मान्यवरांनी घेवून स्व. भाऊसाहेब महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी महिला व बालकल्याण सभापती श्रीमती वनिताताई गोरे, माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील, राजू भोसले, माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सतिश चव्हाण, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, मिलींद कदम, माजी उपसभापती दादा शेळके, माजी सदस्य राहूल शिंदे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनिल काटे, नगरसेवक धनंजय जांभळे, जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष धनंजय शेडगे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रवि कदम, संचालक सुरेश सावंत, सौ. कांचनताई साळुंखे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोरपडे, अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष अजित साळुंखे, संचालक सुरेश टिळेकर, माजी उपाध्यक्ष गणपतराव मोहिते, गणपतराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार, उप सभापती मधुकर पवार, धनाजी जाधव, आनंदराव कणसे, विजय पोतेकर, पद्मसिंह फडतरे, युनियन अध्यक्ष श्री. दिलीप शेडगे, सरचिटणीस सयाजी कदम, सातारा- जावली तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कामगार-कर्मचारी तसेच अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी, कामगार- कर्मचारी, सभासद, शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

