दैनिक स्थैर्य | दि. 14 डिसेंबर 2023 | कोळकी | देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या विकास कामांची माहिती प्रत्येक गावागावांमध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन सरकारच्या विविध विभागाच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात यावी. तसेच जे लाभार्थी सरकारी लाभापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. तळागाळातील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत व त्यांच्या विकासामध्ये सरकारचा सहभाग असावा. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर यांनी प्रयत्न करावेत; असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
कोळकी या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे गावामध्ये आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी सुनील जगताप उपस्थित होते. कोळकी ग्रामपंचायतचे उपसरपंच विकास नाळे, कामगार नेते बाळासाहेब काशीद, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष पै. संजय देशमुख, युवा नेते उदयसिंह निंबाळकर, माजी सरपंच ताठ विद्यमान सदस्या सौ. रेश्मा देशमुख, सौ. प्राजक्ता काकडे, सौ. विजया नाळे, गणेश शिंदे, ग्रामसेवक रमेश साळुंखे, कैलास नाळे, यशवंतराव जाधव, लोंढे काका, रामभाऊ शेंडे, रणजीत जाधव, गोरख जाधव उपस्थित होते.
यावेळी केंद्र शासन व राज्य शासनाचे कोणत्या योजना आहेत ते सांगितले त्यामध्ये आयुष्मान भारत योजना, श्रम कार्ड, बांधकाम कामगार, किसान सन्मान योजना, मोल मजुर करणारे बांधकाम कामगाराच्या बाबत मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लाभ देणारे मुलींसाठी मोफत व्यवसायीक शिक्षण, महिलांसाठी उज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजना, ऑपरेशन ग्रीन योजना, अंत्योदय अन्न योजना, मातृत्व वन्दना योजना, विश्वकर्मा योजना अशा अनेक योजनांची माहिती यावेळी जयकुमार शिंदे यांनी दिली.
यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते यावेळी उपसरपंच विकास नाळे यांनी आभार मानले.