सुख, समृद्धी आणि आनंदाच्या रंगांची उधळण सर्वांच्या आयुष्यात व्हावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होळी, धूलिवंदनाच्या शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि. ०७ मार्च २०२२ । मुंबई । होळी आणि धुलिवंदनाचा सण निसर्गाशी आपले नाते सांगणारा, जीवनात विविध रंगांची उधळण करणारा सण आहे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची उधळण व्हावी, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

तसेच पर्यावरणाचे रक्षण करत पर्यावरणपूरक पद्धतीने होळी आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले आहे. हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, या सणांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जागरुकता वाढीस लागणाऱ्या उपक्रमांचे आयोजन व्हावे. अनिष्ट रूढी व परंपरांचे निर्मूलन व्हावे.


Back to top button
Don`t copy text!