दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा पदाधिकारी यांचे दोन दिवसीय पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण शिबिर ओम लॉन्स चचेगाव, कराड या ठिकाणी दिनांक 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी पार पडले . या शिबिरात 250 सदस्यांनी भाग घेतला होता .
भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण शिबिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहेत, पदाधिकाऱ्यांना उपयुक्त असणारे आणि भारतीय जनता पार्टीचे च्या ध्येय धोरणांची संपूर्ण माहिती या प्रशिक्षण वर्गामध्ये दिली जात असते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये याप्रकारच्या शिबिरांचे आयोजन करून पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून, त्यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करायचे या उद्देशाने ही कार्यकर्ते पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जातात , या आधी सातारा जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग आणि ग्रामीण भागात प्रशिक्षण शिबिरे झाली आहेत
सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांसाठी , जिल्हा संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वडणे, सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल, विट्ठल बळशेटवार, सचिन घाटगे, भरत मुळे यांनी चचेगाव कराड येथे व्यवस्थित नियोजन केले, पदाधिकाऱ्यांना अनेक विषयांची माहिती देण्यात आली, केंद्र सरकारी योजना ,प्रशिक्षणाचे महत्त्व ,सोशल मीडियाचा प्रभावी वापर, भाजपचा इतिहास व विकास,कार्यपद्धती आणि संघटन संरचनेतील भूमिका, निवडणूक व्यवस्थापनाचे महत्त्व, कृषी कायदे वास्तव आणि विपर्यास ,भारताचे वाढते सामर्थ्य जागतिक योगदान, आणि बदलत्या परिस्थितीमध्ये भाजपाचे नेतृत्वाचे महत्त्वाचे योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे , प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर,महिला मोर्चा माजी प्रदेशाध्यक्षा माधवीताई नाईक , प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवनाना काळे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये,प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत नाना पाटील यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले ,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच सातारा शहराध्यक्ष आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास गोसावी,जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी आभार मानले .