निंभोरे येथे वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू


दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण तालुक्यातील निंभोरे येथे आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गानजीक राजेंद्र बाबुराव अडसूळ (रा. निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या गव्हाच्या शेतात २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. हा बिबट्या नर जातीचा ५ ते ६ वर्षे वयाचा होता.

या प्रकरणी अज्ञात वाहनावर वनरक्षक फलटण यांनी वनगुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!