दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सरडे (ता. फलटण) येथे मुस्लीम समाजातर्फे जनावरांचा व्यापार केला जातो. त्यांना प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याचा कायदा याविषयी सखोल मार्गदर्शन करून कत्तलीसाठी जनावरांचा व्यापार करू नका, फलटण ग्रामीण पोलिसांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
गोवंश हत्येवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तसेच कोणतेही पाळीव प्राणी कत्तलीसाठी नेण्यापूर्वी वैद्यकीय अधिकार्यांकडून तो उत्पादित आहे किंवा अनुत्पादित आहे, याची तपासणी करून घेणे तसेच वाहनांमध्ये जेवढा वाहन परवाना आहे तेवढ्याच जनावरांची वाहतूक करावी, जनावरांना क्रूरपणे कोंबून गाडीमध्ये तोंड बांधून वाहतूक करू नये, हे ठळक मुद्यांवर उहापोह केला. यामधून गोरक्षक व व्यापारी यामध्ये संघर्ष होऊ नये म्हणून कायदेविषयक बाबींचे पालन करावे. तसेच कोणत्याही उत्पादित पशूची कत्तल करता येत नाही, अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.