
दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला ज. धोटे, अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, आणि शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, सातारा येथे ”जागतिक लोकसंख्या दिवस आणि जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आणि मुलांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाव बेटी पढाव या विषयी विधी जागरुकता कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी धनंजयराव गाडगीळ कॉलेजचे प्राध्यापक डॉ. राजश्री जावळे यांनी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आणि मुलांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाव बेटी पढाव या विषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाचे महत्व व त्याबाबतची माहिती दिली. तसेच मुलांचे हक्क व शिक्षणाचा हक्क या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तर दिवाणी न्यायाधीश क.स्तर एस. एस. साळवे यांनी जागतिक लोकसंख्या दिवसाचे महत्व व त्यासंबंधीची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये एकूण 178 विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षीका उपस्थित होते. भाईशैलेंद्र माने, उप प्राचार्य यांनी प्रास्ताविक केले तर लघुलेखक दिलीप भोसले यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.