स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेळे कामथी येथे कायदेविषयक जागरुकता शिबीर संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । सातारा । स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वेळे (कामथी) येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 विषयी जागरुकता शिबीर आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव यांनी कौटुंबिक कलहातून निर्माण होणारे वाद व त्यावर कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे. तसेच जर असे प्रसंग उद्भवले तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत सहायक व सल्ला घ्यावा,असे सांगितले

ॲङ मनिषा बर्गे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 या कायद्यातील तरतुदीबद्दल माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!