
स्थैर्य, सातारा, दि. 24 नोव्हेंबर : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने येत्या शुक्रवारपासून पुरोगामी महिलांच्या साहित्यावर नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये व्याख्यानमाला सुरू होणारा असून त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती, अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी दिली.
गेल्या 39 वर्षापासून थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला महात्मा फुले स्मृतिदिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी ’ मी आणि माझे लेखन: पुरोगामी महिला साहित्यिकांचे विचारमंथन’ या विषय सूत्रावर ही व्याख्यानमाला गुंफली जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मान्यवर पुरोगामी महिला साहित्यिकांची भाषणे होणार आहेत.
नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये ही व्याख्यानमाला 28 नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. महात्मा फुले यांना अभिवादन करुन या व्याख्यानालेला प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी 28 नोव्हेंबरला डॉ. विजया पाटील (कोल्हापूर ), शनिवारी 29 नोव्हेंबर – डॉ. सुनिता बोर्डे ( सांगली), रविवार 30 नोव्हेंबर – प्रा. इंदुमती महावीर जोंधळे ( पुणे), सोमवार 1 डिसेंबर – डॉ. दीपा श्रावस्ती ( सांगली), मंगळवार 2 डिसेंबर -अंजली चिपलकट्टी ( पुणे), बुधवार 3 डिसेंबर – प्रा. वृषाली मगदूम ( मुंबई), गुरुवार 4 डिसेंबर – कुंदा कांबळे ( मायणी ) शुक्रवार 5 डिसेंबर – डॉ. मानसी लाटकर (सातारा) शनिवार 6 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन.
रविवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता यावर्षीचा 27 वा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, शिवाजी विद्यापीठ विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे ( कोल्हापूर) यांना श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते विशेष समारंभात पाठक हॉल मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहावे, असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे, अॅड. हौसेराव धुमाळ,सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विश्वस्त डॉ. जयपाल सावंत, अनिल बनसोडे, केशवराव कदम, अशोक कांबळे, प्रकाश गायकवाड व अशोक भोसले यांनी केले आहे.

