दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
रसिक कला क्रीडा व सांस्कृतिक मंच, राजाळे यांच्यातर्फे पर्यावरणप्रेमींसाठी उद्या, शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ‘वृक्ष संवर्धन व देवराई’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. निसर्ग जागर प्रतिष्ठानचे डॉ. महेश गायकवाड हे व्याख्यान देणार आहेत.
हा कार्यक्रम राजाळे येथील धनंजय निंबाळकर (आबा) यांच्या शेतावर होणार असून व्याख्यानानंतर वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी उपस्थित पर्यावरणप्रेमींसाठी अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी निसर्गप्रेमींसह परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रसिक कला क्रीडा व सांस्कृतिक मंच राजाळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.