‘चला बोलूया मानसिक आरोग्यावर’ विषयावर उद्यानविद्या महाविद्यालयात व्याख्यान संपन्न


स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि महाविद्यालय आणि लायन्स क्लब, फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने, श्रीमंत संजीवराजे यांच्या एकसष्टीपूर्तीनिमित्त ‘चला बोलूया मानसिक आरोग्यावर’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ. राजश्री नाळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. राजश्री नाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनाची एकाग्रता, स्व-संवाद, ताण-तणाव व नैराश्यावर मात करणे, सामाजिक माध्यमांवरील नियंत्रण आणि सकारात्मकतेचे महत्त्व यावर सविस्तर विवेचन केले. उत्तम मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग आणि शारीरिक लवचिकतेचे महत्त्व पटवून दिले. लायन्स क्लबच्या अध्यक्षा संध्या गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. एस. रासकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पी. व्हि. भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!