दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । सातारा । लोक स्वातंत्र्याच्या अर्थात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त सातारा येथील मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने गुरुवार दि २९ सप्टेंबर रोजी सातारच्या मौलाना अबुल कलाम आझाद मैदान , गुरुवार परज येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचे योगदान या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केल्याची माहिती मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे .
सातारच्या गुरुवार परत येथे गुरुवार दि २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सोलापूर येथील इतिहास संशोधक आणि विचारवंत सरफराज अहमद यांचे ” भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचे योगदान ” या विषयावर तर सातारचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके यांचे ” सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुस्लिम जागृती अभियान चे मिनाज सय्यद व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे जयंत उथळे यांनी केले आहे.