दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२४ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (फलटण विभाग) यांच्याकडून ‘श्री शिवप्रताप दिना’निमित्त आज, गुरुवार दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर व्याख्यान सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा छ. श्री. शिवाजी महाराज चौक, फलटण येथे होणार आहे.
यावेळी समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराज व्याख्यान देणार आहेत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (फलटण विभाग) यांनी दिली आहे.