दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सावळज । सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.सुनील दबडे यांचे सावळज येथील सिध्देश्वर पतसंस्थेच्या सभागृहात ” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर नुकतेच व्याख्यान पार पडले . सावळजच्या जेष्ठ नागरिक संघातर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सिदगौड पाटील , प्रकाश पाटील , महादेव चिवटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वास पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचीव ताजुद्दीन तांबोळी , तालुका अध्यक्ष नलिनी पवार , पतसंस्थेचे मालक प्रकाश पाटील , जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील , तासगाव तालुक्याचे सेवादल अध्यक्ष मच्छिंद्र पाटील , तालुका उपाध्यक्षा सोनाली पाटील , राष्ट्रवादीच्या तासगाव शहराच्या उपाध्यक्षा पुनम माळी ,रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी एस. ए . पाटील , सावळजच्या सरपंच पोळ मॅडम तसेच संघाचे बहुसंख्य सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी प्रा . दबडे यांचा तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सावळजच्या जेष्ठ नागरिक संघातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी दबडे यांनी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस करीत असलेल्या सामाजिक कामांचे भरभरून कौतुक केले . जेष्ठ नागरिक संघ जेष्ठांसाठी चांगले उपक्रम राबवित आहे याबद्दलही दबडे यांनी संघाचे कौतुक केले . ” चला आनंदाने जगुया ” . या विषयावर यावेळी प्रा . दबडे यांचे बहारदार व्याख्यान झाले . व्याख्यानाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला . यापूर्वी तासगाव शहरातही या विषयावर दबडे यांचे व्याख्यान झाले होते . हे व्याख्यान जेष्ठांसाठी , तरुणांसाठी , महिला वर्गासाठी उपयुक्त असल्यामुळे या व्याख्यानाला मागणी वाढत आहे . व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . ऊनऊने यांनी केले .