‘महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि विकास’ या विषयावर उद्या सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांचे व्याख्यान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २२: सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार हे ‘महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि विकास’ या विषयावर उद्या २२ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३३ वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. या व्याख्यानमालेत २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीराम पवार विचार मांडणार आहेत. 

श्रीराम पवार यांच्याविषयी

महाराष्ट्रातील नामांकित सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार हे गेल्या २७ वर्षांपासून सक्रिय पत्रकारितेत आहेत. त्यांनी बीएस्सी, एमए (राज्यशास्त्र) पदवी आणि एमजेसी ही पत्रकारितेतील पदवी मिळविली आहे.

दैनिक पुढारीमध्ये प्रशिक्षणार्थी बातमीदार ते मुख्य बातमीदार असा त्यांचा सुरुवातीचा प्रवास. यानंतर दै.सकाळ (कोल्हापूर) येथे सहवृत्तसंपादक, दै.सकाळ(सातारा) येथे सहयोगी  संपादक आणि दै.सकाळ (कोल्हापूर) येथे कार्यकारी संपादक, उपमुख्य संपादक आणि सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक अशा पदांवर त्यांनी कार्य केले आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणावरील ‘धुमाळी’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.समाज माध्यमांमुळे झालेल्या बदलांविषयीचे संपादित लेखन असलेले ‘संवाद क्रांती’ हे  त्यांचे पुस्तकही प्रसिध्द आहे.

राजकारण, सहकार, राष्ट्रीय राजकारण व आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य,क्रीडा, शिक्षण आदी विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. शोधपत्रकारितेतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

श्री. पवार हे कोल्हापूर प्रेस क्लबचे ते संस्थापक सदस्य तथा माजी अध्यक्ष आहेत.साताऱ्यातील इतिहास परिषदेचे सदस्य, सातारा येथील स्टडी सर्कलचे संस्थापक सदस्य यांसह अनेक सामाजिक चळवळी व पर्यावरणविषयक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

समाज माध्यमांद्वारे उद्या व्याख्यानाचे प्रसारण

गुरुवारी, 22 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!