
दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । मुंबई । राज्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांचे नॅनो हौसिंग या विषयावर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांनी आज दि. ०७ जानेवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. तरी सदरील व्याख्यानाचा लाभ हा व्यावसायिक, ग्राहक, विद्यार्थी यांनी घ्यावा असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष रणधीर भोईटे यांनी केलेले आहे.
कोरोना काळानंतर घरांची किंवा त्यातील खोल्यांची संख्या याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतू महागाईमूळे इतके मोठे घर सर्व सामान्य माणसाला परवडू शकत नाही. अशावेळी घरांच्या किंमती नियंत्रीत ठेवणेसाठी, घरांचा आकार, बांधकाम खर्चात बचत या दोन पर्यायावर सखोल अभ्यास करुन सर्वोच्च पदवी प्राप्त केलेले सुरेश हावरे यांनी नवी मुंबईमध्ये नॅनो हाऊसिंग चा प्रयोग यशस्वीरित्या राबवलेला आहे. याद्वारे हजारो घरे उपलब्ध करुन दिलेली आहेत. याचा प्रसार व्हावा व ग्राहकांना कमी किंमतीत चांगले घर उपलब्ध व्हावे म्हणून हे तंत्रज्ञान व्यवसासिकांपर्यंत पोहचवणेसाठी बिल्डर्स असोसिएशन मार्फत हे व्याख्यान आयोजित केले आहे.
या प्रसंगी रेरा समिती चेअरमन आनंद गुप्ता, स्वप्नील कौलगूड, दिलीप शिंदे, किरण दंडिले, संजय संघवी व मोहिंदर रिझवाणी हे उपस्थित राहणार आहेत. सदर व्याख्यान हे विडीओ कॉन्फरसिंग (झूम) द्वारे होणार असुन https://is.gd/jKXjzL सदरील लिंक द्वारे जॉईन व्हावे असे आवाहन सचिव दिलीप शिंदे यांनी केलेले आहे.