दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । सातारा । सातारा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने येत्या बुधवार दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या साठी योग प्रशिक्षक बन्सीलाल शेठ यांचे योगा व प्राणायाम या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिके यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम सभासदांसाठी खुला आहे अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह विजय मांडके व खजिनदार मदनलाल देवी यांनी दिली.
सातारा जेष्ठ नागरिक संघाच्या राजवाड्याजवळील श्री छ प्रतापसिंह महाराज (थोरले) उद्यानातील सभागृहात बुधवार दि १८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.
ज्येष्ठ नागरिक संघ , सातारच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित केले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून योगा प्रशिक्षक *बन्सिलाल शेठ* यांचा योगा व प्राणायाम या अनुषंगाने व्याख्यान व प्रात्यक्षिके असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
बन्सीलाल नारायणदास शेठ हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयातील योगा मधील एम ए ही पदवी ते उत्तीर्ण आहेत. तसेच योगा थेरपीस्ट म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. १९८४ पासून ते योगाच्या अनुषंगाने प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. डॉ बालाजी तांबे यांच्या लोणावळा येथील कैवल्यधाम येथे त्यांनी प्राणायामचे प्रशिक्षण घेतले असून तेथे ते मेडिटेशन साठी सुद्धा प्रशिक्षक म्हणून जात असतात. रोटरी क्लब सातारा यांचेही ते सदस्य आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग जेष्ठ नागरिकांना सुद्धा व्हावा यासाठी बन्सीलाल नारायणदास शेठ यांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी व श्रीमती ज्योती मोहिते यांनी केले आहे .