
दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२३ । मुंबई । एसएआर ग्रुपचा विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा ब्रँड लेक्ट्रिक्स ईव्हीने त्यांच्या वेबसाईटवर एक अतिशय अनोखे इन्स्टंट लोन एलिजिबिलिटी टूल सुरु केले आहे, ज्याच्या साहाय्याने कोणत्याही दुचाकीसाठी कर्ज पात्रता अगदी लगेच तपासता येईल आणि या प्रक्रियेला पेवॉल जोडण्यात आलेली नाही.
भारतात जास्तीत जास्त लोकांनी विजेवर चालणारी वाहने स्वीकारावीत यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या उद्देशाने, हे टूल ग्राहकांच्या वेळेची बचत व्हावी, चिंता कमी व्हावी व त्यांना खरेदीचा निर्णय तातडीने घेता यावा यादृष्टीने डिझाईन करण्यात आले आहे. यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांपैकी एक, आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात आलेले लेक्ट्रिक्सईव्हीडॉटकॉमवरील फ्री इन्स्टंट लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर विडजेट ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोर फक्त ३ सहजसोप्या टप्प्यांमध्ये समजून घेण्यात मदत करेल.
लेक्ट्रिक्स ईव्ही ही एक ग्राहककेंद्री कंपनी आहे त्यामुळे छोट्या रिटेल खरेदीदारांना निर्णय घेत असताना ज्या चिंता व प्रश्नांना सामोरे जावे लागते त्यांची पुरेपूर समज कंपनीला आहे. त्यांनी प्रस्तुत केलेल्या या एलिजिबिलिटी टूलमध्ये कर्जाचा कालावधी, बँक निवडणे, ग्राहकांच्या उत्पन्न श्रेणीनुसार दुचाकीसाठी पात्रता अशा अनेक वेगवेगळ्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. अतिशय प्रभावी तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या टूलमध्ये खरेदीबाबत अंतिम निर्णय घेण्याआधी कर्जाचे विविध पर्याय तपासण्याची मजबूत व त्वरित काम करणारी यंत्रणा उपलब्ध आहे.
एसएआर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे एमडी आणि सीईओ श्री. के. विजय कुमार यांनी सांगितले, “आम्ही असे मानतो की, प्रत्येक व्यक्तीला ईव्ही स्कुटर अगदी सहज विकत घेता आली पाहिजे. भारतातील ईव्ही बाजारपेठेत प्रचंड क्षमता उपलब्ध आहेत. सध्या भारतात दुचाकी विभागात ईव्हीचे प्रमाण फक्त जवळपास ५०% आहे, जे व्हिएतनाम आणि इंडोनेशिया सारख्या देशांपेक्षा देखील कमी आहे, या देशांमध्ये ८०% पेक्षा जास्त लोकांकडे दुचाकी आहे. २०३० सालापर्यंत उत्सर्जनाचे प्रमाण ४५% नी कमी करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांचे योगदान खूप मोठे असणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ज्यांचा लाभ घेता येईल अशा सहजसोप्या, तातडीने उपलब्ध होणाऱ्या कर्जसुविधा देऊन ईव्ही स्वीकाराचे प्रमाण वाढवावे हा आमचा उद्देश आहे. लेक्ट्रिक्स ईव्ही स्कुटर्स आणि लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर प्रस्तुत करून आम्ही याच दिशेने पुढची पावले उचलत आहोत.”