17 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील पदासाठी महिला आरक्षण सोडत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय स्तरावर पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात एकाच वेळेस भरती प्रक्रिया राबविण्याबाबतचा सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडील कालबध्द कार्यक्रम आणि सातारा उपविभागातील सातारा व जावली तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावांची यादी उपविभागीय अधिकारी  कार्यालय सातारा व तहसिल कार्यालय सातारा, जावली यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. गावांसाठी पोलीस पाटील रिक्त पद सरळसेवा भरतीकामी 100 बिंदूनामावली व प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रवर्गनिहाय आरक्षणामधून 30 टक्के महिला आरक्षण सोडत गुरुवार दि. 17 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वा. तलाठी निवास, एस. टी. स्टँड समोर, सातारा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्र. उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग सातारा ज्योती पाटील यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!