मोबाईल सोडून मैदानी खेळ खेळा; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे तरुणांना आवाहन

मुधोजी क्लबच्या नूतनीकरण समारंभात केले मार्गदर्शन, स्थानिक खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली


स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑगस्ट : तरुण पिढीने मोबाईल गेमिंगच्या आहारी न जाता मैदानी खेळांकडे वळले पाहिजे, कारण आरोग्यासाठी खेळासारखा दुसरा उत्तम उपाय नाही, असे आवाहन विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण येथील ऐतिहासिक मुधोजी क्लबच्या नूतनीकरण समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, जोपर्यंत शरीर साथ देत आहे, तोपर्यंत प्रत्येकाने खेळणे सोडू नये. त्यांनी खो-खो आणि कबड्डीसारख्या स्थानिक खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. तसेच, खेळाडूंना चांगल्या प्रशिक्षकांची गरज असल्याचे अधोरेखित केले. क्लबला भविष्यात आर्थिक गरज भासल्यास कॉर्पोरेट मेंबरशिपच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका श्रीमंत सौ. सुभद्रराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह विविध मान्यवर आणि क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!