स्वामींवर सर्व सोपवा, स्वामी तुमचे कल्याण करतील : प.पु.विनोद गांधी


स्थैर्य, वडूज (सुयोग लंगडे) : कलियुगात श्री स्वामी समर्थ हेच तारणहार आहेत. त्यांचे ठायी अनन्य भावाने श्रद्धा ठेवा, त्यांच्यावर सर्व काही सोपवा, तुमचे कल्याण करतील असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ मंदिर वडूजचे प्रणेते व मार्गदर्शक प.पु.विनोद गांधी उर्फ गांधी दादा महाराज यांनी केले.

येथील स्वामी समर्थ ट्रस्ट व स्वामी भक्त परिवाराच्या वतीने आयोजित ८१ व्या वाढदिवसाच्या समारंभात सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी समर्थ ट्रस्ट चे सचिव प्रा.नागनाथ स्वामी सर यांनी गांधीदादांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. स्वामीभक्त व विविध संस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन प.पु.गांधी दादांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास स्वामी भक्त माई राऊत, सुनील राऊत, दिगंबर बदक, योगेश दाभाडे (कीवत-भोर), विष्णुपंत ननावरे (बदलापूर), गुरुलिंग स्वामी, राहुल शिंदे, अमोल टिळेकर, महादेव जगदाळे, सुधीर जगदाळे, लावंड साहेब, स्वामी ट्रस्टचे अध्यक्ष शरद गोडसे, उपाध्यक्ष अश्विन बोटे, खजिनदार दादू कुलकर्णी, पत्रकार पदमनील कणसे, बंटी लंगडे व स्वामीभक्त उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!