दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । फलटण । श्रीमंत रामराजे क्रिकेट अकॅडमी व न्यु विजय क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 16 वर्षाखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या.
या स्पर्धसाठी आठ संघानी सहभाग घेतला होता यात सातारा, बारामती, भिगवण, वालचंदनगर व फलटणच्या संघानी भाग घेतला होता. 10 दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी इस्माईल शेख यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत अंतिम सामना रामराजे क्रिकेट अकॅडमी फलटण व रॉयल क्रिकेट क्लब बारामती यांच्यात झाला. फलटणच्या संघाने विजेतेपद मिळवत प्रथम पारितोषिक रूपये पंधरा हजार रोख व चषक पटकावले तसेच रॉयल बारामतीने द्वितीय क्रमांक रुपये दहा हजार रोख व चषक मिळवला या सामन्याच्या नाणेफेकीसाठी उद्योजक संतोष माने हे होते. माने यांनीच प्रथम पारितषिक रुपये पंधरा हजार पुरस्कृत केले होते. यास्पर्धेत बेस्ट फलंदाज – राजसिंह साळुंखे – फलटण, बेस्ट गोलंदाज – दक्ष पहाडे – बारामती, बेस्ट यष्टीरक्षक – अभिषेक कदम – फलटण, अंतिम सामन्याचा सामनावीर – अथर्व ठोंबरे – फलटण, स्पर्धेचा मानकरी – समीर कोराटकर – बारामती, यांना मिळाले.
अंतिम सामना पाहण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर हे आवर्जून उपस्थित होते. बक्षीस समारंभ सदानंद प्रधान यांचे अध्यक्षतेखाली प्राचार्य पी. एच. कदम यांच्या हस्ते व संतोष माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास समीर तांबोळी, राजाभाऊ शिपटे, प्रा.पवार जिमखाना प्रमुख पाटील व तरटे हे उपस्थित होते.
स्पर्धसाठी कष्ट घेतलेले सोमनाथ चोधरी, मिलिंद चौधरी, मदने सर, इंद्र्जित पवार, संदेश साळुंखे, फिरोज शेख, आर्यन शिंदे व अंतिम सामन्याचे पंच प्रधान सर यांचा सन्मान प्राचार्य पी. एच. कदम यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन मदने सरांनी केले व शेवट आभार मिलिंद सहस्त्रबुध्दे यांनी मानले.