लीनेस क्लबच्यावतीने रुग्णांना आरोग्यवर्धक नाष्ट्याचे वाटप


दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। बारामती । येथील ऑल इंडिया लीनेस क्लब च्या ’रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ’ या अंतर्गत रुई ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना पौष्टीक आरोग्य वर्धक नाष्टा व रुग्णालयात लागणारे अत्यावश्यक साहित्य चे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे ,सचिव मनीषा खेडेकर सदर उपक्रम प्रमुख सुनंदा जगताप, राणी जगताप, लता भोसले व सदस्यां सुचिता ढवाण, सपना चांदगुडे, उल्काताई जाचक, विजया कदम आणि आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, सोमेश्वर कारखान्याच्या मा. उपाध्यक्षा प्रणिता खोमणे व रुई ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यास्मिन पटेल व इतर मान्यवर उपस्तीत होते.

लिनेन्स क्लबच्या वतीने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून,रुग्णांना व नातेवाईक यांना मदत करणे व डॉक्टर व नर्स यांच्या साह्याने आजार होऊ नये म्हणून जनजागृती करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य असल्याचे लीनेस क्लबच्या वतीने सुनंदा जगताप यांनी सांगितले. विजया कदम यांनी आभार मानले


Back to top button
Don`t copy text!