
स्थैर्य, मुंबई, दि.१९: महाविकास आघाडीचे
ज्येष्ठ नेते पाऊस नुकसानीचा पाहणी दौरा करत आहेत. मात्र, या दौ-यावर माजी
खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘महाविकास आघाडीचे नेते शेतीच्या
बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतक-यांना केंद्र सरकार मदत करणार?’, असा
खोचक सवाल निलेश राणे यांनी केला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद दौ-यादरम्यान
पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतक-यांना भरीव मदत मिळावी यासाठी
महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
घेणार, असं सांगितलं. मात्र, यावर निलेश राणे यांनी टीका केली.
‘महाराष्ट्रातील शेतक-यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व
खासदारांना घेवून पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार यांनी
म्हटलं आहे. आता असं झालंय, महाविकास आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो
काढणार आणि शेतक-यांना केंद्र सरकार मदत करणार’, असा चिमटा निलेश राणे
यांनी ट्विटरवर काढला.