न केलेल्या कामाचे श्रेय राजे गटाच्या नेत्यांनी घेऊ नये – लहूराज मोहिते


दैनिक स्थैर्य । 27 मे 2025। फलटण । गेले दोन-तीन दिवसापासून फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने मुळीकवाडी तलावात पूर्ण क्षमतेने पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. त्यादरम्यान आमच्या सहकार्‍यांच्या तलाव्याच्या सांडव्या शेजारची भिंत पडल्याची निदर्शनास आली. याबाबतची माहिती माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांना सांगितली.

याबाबत योग्य दखल घेऊन रणजितदादांनी व आमदारांनी प्रांत अधिकारी आंबेकर यांना सूचना केल्या. त्यानंतर याठिकाणी कार्यकर्ता अभियंता शिवाजीराव जाधव, उपअभियंता धनंजय कोकरे, विश्वनाथ कपाट, शाखा अभियंता जमादार याठिकाणी येऊन पोकलेनच्या सहाय्याने हे काम पूर्ण केले. परंतु ज्यांनी कोणत्याही प्रकारचे काम केले नाही,परंतु श्रेय घेण्यासाठी पुढे आले आपण जे काम केलं नाही. त्याचं श्रेय घेणं हे कितपत योग्य आहे. राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये.

हे काम मार्गी लावल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचे मुळीकवाडी ग्रामस्थांच्यावतीने तसेच शेतकरी बांधवांच्यावतीने खूप खूप धन्यवाद.

  • लहूराज मोहिते,

सदस्य ग्रामपंचायत मुळीकवाडी


Back to top button
Don`t copy text!