विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम – आनंद रेखी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । मुंबई । अत्यंत अभ्यासू, विरोधकांच्या राजकीय डावपेचांना धुव्वा उडवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या बुद्धीचार्तुयाने महाविकास आघाडीला ‘चित’ केले आहे. अत्यंत अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत संघटन तसेच नेतृत्व कौशल्याच्या बळावर ‘गणितशास्त्रा’चा चपखल बुद्धीकौशल्याने वापर करीत फडणवीस यांनी भाजपचा तिसरा उमेदवार निवडूण आणला, यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, अशा शब्दात भाजप नेते आनंद रेखील यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे देखील त्यांनी विशेष आभार मानले आहे.

राज्यसभेतील विजय म्हणजे भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा असलेल्या अतुट विश्वासाचे प्रतिक आहे.जनमताचा अनादर करणार्या महाविकास आघाडी सरकारला हा अप्रत्यक्षरित्या जनतेनेच शिकवलेला धडा असल्याचे रेखी म्हणाले. मा.फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे निवडणुकीत सहावा उमेदवार उभा करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना परवागनी दिली.

पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचे सोनं करीत फडणवीस यांनी निवडणूक कौशल्याच्या बळावर ‘चाणक्य’नितीनूसार सहावे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. या निवडणुकीत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्यावर दाखवलेला विश्वास पक्षातील नेत्यांनी मेहनत आणि संघटनात्मक कार्यानी सार्थकी ठरला.पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील महाराष्ट्राच्या नेतृत्वात विश्वास ठेवून त्यांना बळ दिल्याने त्यांचे आभार यानिमित्ताने रेखी यांनी व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील अशाचप्रकारे मा.फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महाविकास आघाडी सरकारचा घुव्वा उडवेल, असा दावा देखील यानिमित्ताने रेखी यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!