सांगवी येथे मटका अड्डयावर एलसीबीचा छापा


दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । फलटण । फलटण दि.सांगवी ता. फलटण येथे कल्याण जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात १२४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पोपटराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २३ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत फलटण तालुक्यातील मटका अड्डय़ाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार यु. सी. दबडे व पोलीस नाईक काशिद व पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे हे पेट्रोलिंग करत असताना फलटण – बारामती जाणारे रस्त्याकडेला दत्त मंदिर पाठीमागे सांगवी ता. फलटण येथे बापूराव पांडुरंग वाघ ( वय ३५ वर्ष रा. सांगवी ता फलटण ) हा स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता लोकांकडून पैसे स्वीकारून आकडा व स्वतःच्या फायद्याकरता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार घेताना आढळून आला आहे.

पोलीसांनी टाकलेले छाप्यात त्याच्याकडून १२४५ रुपये रोख रक्कमेचा मुद्देमाल व जुगार साहित्य मिळून आले असून याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!