स्थैर्य, सातारा, दि.१७: एलसीबीने जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या आणि रेशनिंग दुकान फोडणारे अशा दोन सराईत गुन्हेगार टोळ्याना हिसका दाखवून गुन्ह्यांचा छडा लावला आहे. यामध्ये २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कराड परिसरामध्ये मोटार सायकल चोरी करणारी टोळी उंब्रज शहरामध्ये वावरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने पथकाने उंब्रज परिसरामध्ये त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी कोपर्डे हवेली, ता. कराड येथुन दिनांक १० मे २०२१ रोजी १ स्ल्पेंडर मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले. म्हणुन त्यांना कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अटक केली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कराड यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली. यानंतर त्यांच्याकडे सखोल व कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीतून ५ मोटार सायकल , कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून १ मोटार सायकल , कडेगाव पोलीस स्टेशन व तासगाव पोलीस स्टेशन , जि . सांगली हद्दीतून प्रत्येकी १ अशा २ मोटार सायकल तसेच कामोठे पोलीस स्टेशन, नवी मुंबई हद्दीतून १ मोटार सायकल अशा एकुण ९ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्हयाचा तपास सपोनि रमेश गर्जे , स्था.गु.शा. हे करीत असुन अटक आरोपींकडुन आतापर्यंत ७ . मोटार सायकल व १ मोटार सायकलचे इंजिन असा एकुण २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
दरम्यान, १३ मे २०२१ रोजी उंब्रज परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंध पेट्रालिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रमेश गर्जे व पोलीस पथकास दोन इसम उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील नुने, ता.पाटण येथील रेशनिंगचे दुकान फोडून दुकानातील तांदळाची पोती चोरी करुन विक्री करण्याकरीता उंब्रज येथे येणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने पथकाने संशयीत दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून रेशनिंगच्या दुकानातुन चोरी केलेली २ तांदळाची पोती व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करुन उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. संशयीत व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी उंब्रज पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे .
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटीलयांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, पो. हवा. कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, मुनीर मुल्ला , गणेश कापरे , अमित सपकाळ , पो.कॉ.विक्रम पिसाळ , विशाल पवार , रोहित निकम , संकेत निकम , सचिन ससाणे , वैभव सावंत , मयुर देशमुख , मोहसीन मोमीन , विजय सावंत , गणेश कचरे यांनी ही कारवाई केलेली आहे.