स्थैर्य, सातारा, दि. 12 : अमृतवाडी ता.वाई गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर पकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांपा अटक करण्यात आली असून तुषार सुरेश निकम वय 24 वर्षे रा. देगाव, ता. वाई आणि राहुल विश्वनाथ इथापे दोघेही रा. देगाव, ता. वाई अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्या अधिपत्याखाली पथक तयार केले. हे पथक पुणे-बेंगमोर महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. या पथकाला दि. 11 रोजी वाई तालुक्यातील अमृतवाडी ते सरताळे मार्गावर एक संशयास्पद डंपर (एमएच 11 सीएच 5540) याच्या हौद्यातून पाणी गळत असल्याचे दिसून आले. त्यांना संशय आल्याने डंपर थांबवून हौद्यात काय आहे याची पाहणी केली. त्यामध्ये वाळू असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केली असता डंपर चालक व मालकाकडे वाळू वाहतूकीचा परवान नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 18 लाख 57 हजार 775 रुपयांचा डंपर, 3 ब्रास वाळू, मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व दोघांनाह अटक केली असून त्यांच्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ.विशाल पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनानुसार पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, हवालदार तानाजी माने, विजय कांबळे, पो. ना. नितीन गोगावले, प्रविण फडतरे, पो. कॉ. विशाल पवार यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.