गुपचूप दारू विक्री करणार्‍या भुईंजमधील हॉटेलवर एलसीबीचे छापे


स्थैर्य, सातारा, दि. २५: जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धाब्यावर बसवून भुईंज परिसरात गुपचूप दारू विक्री करणार्‍या दोन ठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत माहिती अशी, भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले हॉटेल राजयोग, परमीट रुम बिअर बार येथे हॉटेलचे शटर अर्धे उघडे ठेवून दारूची विक्री चालू असल्याची तसेच विरमाडे गावच्या हद्दीतील देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला.

यावेळी हॉटेल राजयोग परमीट रूम, बिअर बार येथे शटर अर्धे उघडे ठेवून दारूची विक्री करीत असताना दिसून आले. या हॉटेलवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विरमाडे ता. वाई गावच्या हद्दीत किशोर शिवाजी सोनावणे यांच्या राहत्या घराच्या आडोशाला देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण 5 हजार 760 रुपयांचा माल मिळून आल्याने त्यांच्यावर भुईज पोलीस ठाण्यात साथीचे रोग अधिनियम व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, पो.हवा. विजय कांबळे, पो.ना. शरद बेबले, रविंद्र वाघमारे, प्रवीण कांबळे यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!